Devendra Fadnavis On Budget 2025: मध्यमवर्गीय, नोकरदारांसाठी ड्रीम बजेट; देवेंद्र फडणवीस
आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं होतं, तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलं.
याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे, फडणवीस म्हणाले की, यावेळी अर्थसंकल्पाने मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिले आहे.12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. अशी जी इनकमटॅक्सची योजना करण्यात आली आहे, याचा फायदा आता मध्यम वर्गीय आणि तरुणांना होणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार असून अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक विकासात मैलाचा ठरणार आहे.
शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी तेल बियांच्या बाबत देखील निर्णय घेतला गेला आहे. तसेच पाच लाखाचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले तर त्यांना अधिक फायदा होणार आहे. मासेमारी करणार्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. स्टार्ट अपसाठी 20 कोटी रुपयाची क्रेडिट लिमिट करण्यात आली असून, पीपीपी प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात सुरु करण्यात आलेली आहे. युवाच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थ संकल्प आहे. सर्व समावेशक अर्थ व्यवस्थेकडे चाललेला हा अर्थ संकल्प आहे.
तसेच पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या वेळी देखील विरोधकानी आरोप केले होते, राज्याला काही दिले नाही. पण मी मागच्या वेळी प्रमाणे यावेळी देखील काय काय राज्याला मिळाले याची आकडेवारी देईन. विमा क्षेत्रात 100 टक्के एफडीआय महत्वाच आहे. विमा क्षेत्रात जो पैसा असेल तो भारतात गुंतवावा लागेल. मागच्या काळात Lic ने मदत केली, तशी आता विमा कंपनीला मदत करावी लागेल.
कॅन्सर सारख्या आजराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 200 डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत. 36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आली आहे. जास्त व्याज मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका एवढं मी नवीन तरुणाना सांगतो. मी फार काही गुंतवणूक केली नाही मी लोकांमध्ये गुंतवणूक करतो असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे.